भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकांचा

bahut kanavalu bahu ha dayalu | jane lala palu bhavikancha

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
बहुत कनवाळु बहु हा दयाळु । जाणे लळा पाळू भाविकांचा ॥१॥ जात वित गोत न पाहेचि कांहीं । घालावी ही पायीं मिठी उगी ॥२॥ न मागतां आभारी आपेंआप होती । भाविकासी देतो भुक्ति मुक्ति ॥३॥ चोखा म्हणे ऐसा लाघवी श्रीहरी । भवभय वारी दरूशने ॥४॥