भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारें नावडती

bahu maten bahu matantaren | amha nirdharen navadati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु मतें बहु मतांतरें । आम्हा निर्धारें नावडती ॥१॥ अविनाश आहे सुख पंढरीसी । यालागीं तयासी न विसंबो ॥२॥ विठ्ठल देवो जेथे उभे । पुढें शोभे पुंडलीक ॥३॥ एकाजनार्दनीं भ्रमर । कमळ परिकर विठोबा ॥४॥