भजनी मालिका
← भजनांकडे परत

बहु बोलतां वो तोंडें । नायकती जाहले लंडे

bahu bolatan vo tonden | nayakati jahale lande

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बहु बोलतां वो तोंडें । नायकती जाहले लंडे ॥१॥ करिती कुंथाकुंथीं । शिकविलें नायकती ॥२॥ फजितखोर खर । तैसा अभागी पामर ॥३॥ सुनी धांवे वसवसी । तैसी झोंबे विषयासी ॥४॥ एका जनार्दनीं शरण । शिकवितां नायके ज्ञान ॥५॥