भजनी मालिका
← भजनांकडे परत

बह्मांडाची दोरी । हालवी जो एक्याकरीं

bahmandachi dori | halavi jo ekyakarin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
बह्मांडाची दोरी । हालवी जो एक्याकरीं ॥१॥ भूतीं परस्पर मैत्री । तीं ऐक ठायीं असतीं वरी ॥२॥ पंचप्राणांचें जें स्थान । तये कमळीं अधिष्ठान ॥३॥ एका जनार्दनीं सुत्रधारी । बाहुली नाचवी नानापरी ॥४॥