भजनी मालिका
← भजनांकडे परत

आयुष्य तें तीन भाग जाहलें । परी मुखीं राम न बोले

ayushya ten tin bhag jahalen | pari mukhin ram na bole

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आयुष्य तें तीन भाग जाहलें । परी मुखीं राम न बोले ॥१॥ सदा प्रपंचासी मन । वरवर ब्रह्माज्ञान ॥२॥ चित्त शुद्ध झालें नाहीं । ज्ञान कोरडें सांगोनी कायीं ॥३॥ उपाधीचा निषेध भेद । सदा वाद अपवाद ॥४॥ एका जनार्दनीं मना । तेथें राहुं नको जना ॥५॥