भजनी मालिका
← भजनांकडे परत

आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज

ayushya jay majhe vyartha | datta samartha maharaj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आयुष्य जाय माझे व्यर्थ । दत्त समर्थ महाराज ॥१॥ धांव धांव लवकरी । करुणा करी गुरूराया ॥२॥ मी तंव अनाथ अपराधी । हीनबुद्धि स्वामीया ॥३॥ काळ घाला पडिलावरी । धांव श्रीहरी लवलाह्मा ॥४॥ दत्ता पतित पावना । शरण एका जनार्दना ॥५॥