भजनी मालिका
← भजनांकडे परत

आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी

ayushya bhavishya hen tanv kavana hatin | vayanchi vahati kunthakunthi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥ आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळीं सांभळीत ॥२॥ गुंतुनीं संसारी पडती अघोरीं । न चुकेची फेरी येतां जातां ॥३॥ एका जनार्दनीं संतकृपेंविण । कोण वारी शीण जन्मामृत्यु ॥४॥