भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या लोकीं जाहलीं मात । नामें पतीत तरती

avaghya lokin jahalin mat | namen patit tarati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघ्या लोकीं जाहलीं मात । नामें पतीत तरती ॥१॥ तोचि घेउनी अनुभव । गाती वैष्णव नाम तें ॥२॥ तेणें त्रिभुवनीं सत्ता । उद्धरती पतिता अनायासें ॥३॥ एका जनार्दनीं गाजली हांक । नाम दाहक पापांसी ॥४॥