भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघ्या बाहीं म्यां व्योम कवळिलें

avaghya bahin myan vyom kavalilen

अवघ्या बाहीं म्यां व्योम कवळिलें । अवघां ह्रदयीं अरुप धरिलें ॥१॥ अवघेपणें मी त्याचीच जालें । तेंचि पावलें तदाकारें ॥२॥ कांहीं नहोनियां कांहीं एक जाले । अवघाचि शोशिला ब्रह्मरसु ॥३॥ रखुमादेविवरु अवघाचि धरिला । अवघाचि गिळिला अवघेपणें ॥४॥