भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघींच अंगे वेष्टोनि ठेलीं । हरीचिये रंगली निज सेवें

avaghinch ange veshtoni thelin | harichiye rangali nij seven

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघींच अंगे वेष्टोनि ठेलीं । हरीचिये रंगली निज सेवें ॥१॥ तेणेंचि वाटे कृतकुत्यार्थ । चुकले अनर्थ जन्मजरा ॥२॥ सर्व काळ सुखीं सुख । हरिखीं हरिख कोंदला ॥३॥ निळा म्हणे पुरले नवस । आलिया नरदेहास सफळ झालें ॥४॥