भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघेंचि हें कर्मफळ । ओढवलें सकळ जगत्रया

avaghenchi hen karmaphal | odhavalen sakal jagatraya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघेंचि हें कर्मफळ । ओढवलें सकळ जगत्रया ॥१॥ स्वर्ग मृत्यु पाताळ लोक । कर्मबाधक म्हणोनियां ॥२॥ कर्मातीत झाले नर । तया लोकांतर मग कैंचें ॥३॥ निळा म्हणे पृथक होती । म्हणोनि भोगिती पृथकांतें ॥४॥