भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें टाळूनि निमित । वरुनी बोलत आपणा

avaghen taluni nimit | varuni bolat apana

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघें टाळूनि निमित । वरुनी बोलत आपणा ॥१॥ ऐसीं करितो हरि लाघवें । सर्वहि ठावें सर्वज्ञा ॥२॥ बुध्दि बुध्दिचा हा जनिता । स्‍फुर्ति प्रसविता स्फूतींचा ॥३॥ निळा म्हणे आपल्या गोडी । तया आवडी स्तवनाची ॥४॥