भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें परब्रह्मा क्षेत्र ।अवघें तेथें तें पवित्र

avaghen parabrahma kshetra |avaghen tethen ten pavitra

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघें परब्रह्मा क्षेत्र ।अवघें तेथें तें पवित्र ॥१॥ अवघा पर्वकाळ । अवघे दैवाचे सकळ ॥२॥ अवघीयां दुःख नाहीं । अवघे सुखाचि तया ठायीं ॥३॥ अवघे आनंदभरित । एका जनार्दनीं सदोदित ॥४॥