भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये

avaghen mangal tumachen gunanam | majha to shram pahatan jaye

रचनाकार: संत चोखोबा · अभंग
अवघॆं मंगळ तुमचें गुणनाम । माझा तो श्रम पाहातां जाये ॥१॥ गोड हें गोजिरें नाम तुमचें देवा । आठव हा द्यावा मजलागीं ॥२॥ या परतें मागणें दुजें नाहीं आतां । पुरवावी अनाथनाथा आळी माझी ॥३॥ चोखा म्हणे देवा होउनी उदार । ठेवा कृपाकर माथां माझ्या ॥४॥