भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें आयुष्य काळाधीन जाहलें । परी चित्त गुंतलें संसारांत

avaghen ayushya kaladhin jahalen | pari chitta guntalen sansarant

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघें आयुष्य काळाधीन जाहलें । परी चित्त गुंतलें संसारांत ॥१॥ सापें दर्दूर गिळियेला मुखीं । तेणेंचि तो शेखीं मक्षिका धरी ॥२॥ ऐसे हावभरी प्राणी पैं नाडले । म्हणती माझे वहिले कन्यापुत्र ॥३॥ एका जनार्दनीं मृगजळाची आशा । पडे तेणें फांसा गळां बळें ॥४॥