भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघें आनंदाचें । क्षेत्रं विठ्ठल देवांचे

avaghen anandachen | kshetran viththal devanche

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघें आनंदाचें । क्षेत्रं विठ्ठल देवांचे ॥१॥ अवघें हे पावन । तीर्थ चंद्रभागा स्नान ॥२॥ अवघे संतजन । पुंडलिकासी वंदन ॥३॥ अवघा विठ्ठल देव । एका जनार्दनीं भाव ॥४॥