भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे रामराम वदा । नाहीं कळिकाळाची बाधा

avaghe ramaram vada | nahin kalikalachi badha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवघे रामराम वदा । नाहीं कळिकाळाची बाधा ॥१॥ अवघें वदतां नाम । नाममात्रें निष्काम ॥२॥ अवघे रंगुनी रंगले । अवघें नामें उद्धरिलें ॥३॥ अवघियां भरंवसा । एका जनार्दनीं ऐसा ठसा ॥४॥