भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघे करुनि जयजयकार । हषें झाले सुखनिर्भर । म्हणती आतां वारंवार । भय संकोचि न धरावा

avaghe karuni jayajayakar | hashen jhale sukhanirbhar | mhanati atan varanvar | bhay sankochi na dharava

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अवघे करुनि जयजयकार । हषें झाले सुखनिर्भर । म्हणती आतां वारंवार । भय संकोचि न धरावा ॥१॥ तंव यशोदा म्हणे पूर्वीही ऐसें । गर्गाचायें कथिलें विन्यासें । राशिनक्षत्राचेनियां मिसे । उदंड भाषार्थ सांगितला ॥२॥ पुढें वधील कंसासुरा । सोडवील हा मातापितरां । मथुरेसी उग्रसेना नृपवरा । भद्र सिंहासनी बैसवील ॥३॥ करील धर्मांचे पाळण । सकळ पांडवांचे संरक्षण । भीमकीचेंही पाणिग्रहण । करील अरिर्वारां मर्दुनी ॥४॥ वधूनियां भोमासुरा । सोळा सहस्त्र अंत:पुरा । प्रणूनियां हा एकसरा । पुत्रपौत्रीं नांदेल ॥५॥ कौरवां वधील पांडवाहातें । राज्यीं स्थापील हा धर्मातें । उतरुनी भूभारातें । अवनी उत्फुल्लित करील ॥६॥ गोकुळींचियां नगरनारी । रंजवील हा नानापरी । गोवळ गाईचा मनोहरी । क्रीडा करील हा कौतुकें ॥७॥ अतुर्बळिया नारायणु । याशोदे तुझा हा नंदनु । नाटकी कौसाल कान्हु । करील पवाडे अगणित ॥८॥ निळा म्हणे ते प्रसंगीं । स्मरलें अवघें यशोदेलागीं । मग नाना वस्तु पदार्थ चांगी । वरुनी सांडी श्रीकृष्णा ॥९॥