भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवघड तें एक घडलें माझ्या अंगी

avaghad ten ek ghadalen majhya angi

अवघड तें एक घडलें माझ्या अंगी । तीही ऋण चौघी मज देवविलें ॥१॥ ज्यासि दिधलें त्यासी नांव पैं नाहीं । जया रुप नाहीं त्यासी ऋण देवविलें ॥२॥ निवृत्ति गुरुनें अधिक केलें । निमिष्यमात्रीं दाविलें धन माझें ॥३॥ येणें रखुमादेविवरु विठ्ठलें होतें तें आटिलें । सेखी निहाटिलें निरळारंभी ॥४॥