भजनी मालिका
← भजनांकडे परत

अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय

avachat daivayogen nam yet mukha | trailokyacha sakha pran hoy

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अवचट दैवयोगें नाम येत मुखा । त्रैलोक्याचा सखा प्राण होय ॥१॥ आवडी आदरें उच्चारी जो नाम । वैकुंठ निजधाम तया सुख ॥२॥ एका जनार्दनीं नामाची ही थोरी । होतसे बोहरी केली पापा ॥३॥