भजनी मालिका
← भजनांकडे परत

औट पिठावरी निरंतर देश

aut pithavari nirantar desh

औट पिठावरी निरंतर देश । तेथ मी जगदीश असे बाई ॥१॥ त्रिकुटाचा फेरा टाकीला माघारा । अर्धमात्रेवरा वरी गेलों ॥२॥ अर्धनारी पुरुष एकरुप दीसे । तेची ब्रह्म ऐसें जाण बाई ॥३॥ ज्ञानदेवी शून्य नयनी देखिलें । सर्वत्रीं संचलें शून्य एक ॥४॥