भजनी मालिका
← भजनांकडे परत

औट हात चर्म देह बांदवडी

aut hat charma deh bandavadi

औट हात चर्म देह बांदवडी । त्रिगुणाची घडी नुगवे रया ॥१॥ सोकरितां धाया काय करिल माया । श्रीगुरुच्या थायां विरुळा जाणे ॥२॥ सोहंकारा सोहंकारा हरी पोकारा । वायांच मायेचा वारा भरुं नका ॥३॥ सप्तद्वीप पृथ्वी नव खंडें देव । स्वर्गभोगभाव राणिव व्यर्थ ॥४॥ ज्ञानदेवीं सार हरिपंथ पार । एकतत्त्व उच्चार तिहीं लोकीं ॥५॥