भजनी मालिका
← भजनांकडे परत

आत्माराम नयनीं निरखुनी देखिला

atmaram nayanin nirakhuni dekhila

आत्माराम नयनीं निरखुनी देखिला । निळा रंग ओतीला आदी अंती ॥१॥ गोल्हाट त्रिकूट ब्रह्मरंध्रीं वस्तु । तुर्येची ऐसी मातु याच ज्ञानें ॥२॥ ज्ञानदेव म्हणे सर्वा अंतरीं तुर्या । निवृत्ती योगी वेगीं गुज बोले ॥३॥