भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां पुढे बाळचरित्र । कृष्णक्रिडा अति विचित्र । ऐकवां श्रवणी होती पवित्र । गातां वक्र शुचिभूंत

atan pudhe balacharitra | krushnakrida ati vichitra | aikavan shravani hoti pavitra | gatan vakra shuchibhunt

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आतां पुढे बाळचरित्र । कृष्णक्रिडा अति विचित्र । ऐकवां श्रवणी होती पवित्र । गातां वक्र शुचिभूंत ॥१॥ एक अजर एक अक्षर हे भगवत्कथा । श्रवणीं पडतांचि अवचिता । कैवल्यपदप्राप्तीची योग्यता । पावे श्रोता वक्ता तात्काळ ॥२॥ श्रीकृष्णाची हे बाळलीळा । अदभूत सुखाचा सोहळा । वेधूनियां नरनारी बाळा । गाई आणि गावळा ब्रम्हप्राप्ती ॥३॥ ब्रम्हदिक दर्शना येती । सकळही देव आणि सुरपती । गगनी विमानें वाटती । सुमने वरुषति सुरवर ॥४॥ श्रीकृष्णाचें नामकरण । विधिविधानें व्दिजभोजन । नंदयशोदे उल्हास पूर्ण । सुवासिनी ब्राम्हण सर्व जना ॥५॥ मंगळघोषाचिया गजरीं । निशाणें दुमदुमलिया भेरी । टाळ मृदंग झणत्कारी । नाचती वैष्णव पदें गाती ॥६॥ निळा म्हणे नगरवासी । प्रांतवासी देशवासी । आले व्दिपांतरनिवासी । कृष्ण सोहभ पहावया ॥७॥