भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां कारण जें अज्ञान । तेंहीं गेलें वोसरोन । बोधाचें आसन । बैसलें तेथें

atan karan jen adnyan | tenhin gelen vosaron | bodhachen asan | baisalen tethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आतां कारण जें अज्ञान । तेंहीं गेलें वोसरोन । बोधाचें आसन । बैसलें तेथें ॥१॥ कारण रुप सुषुप्ति । आनंद भासत हृदयीं प्राप्ती । या समस्ताची वस्ती । वस्तु झाली ॥२॥ ऐसा असोन वोहोट झाला । ज्ञानरसें पैं भरला । मग सर्वांठायीं देखिलां । आत्मबोध ॥३॥ एका जनार्दनीं आत्म्याची भेटी । तेथें उडाली त्रिगुण । मग बोधासी राहटी । जेथें तेथें ॥४॥