भजनी मालिका
← भजनांकडे परत

आतां आपणया आपण विचरी

atan apanaya apan vichari

आतां आपणया आपण विचरी । सेखी प्रकृती ना पुरुष निर्धारी रया ॥१॥ आता प्रेतांचे अलंकार सोहोळले । कीं शब्दज्ञानें जे डौरले । दीप न देखतीं कांही केले । ऐसें जाणोनियां सिण न मानिती प्रतिष्ठा भोगिती भले रया ॥२॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला देखतांचि जे बोधले । तेणें सुखें होउनि सर्वात्मक जे असतांचि देहीं विस्तारलें । येणें निवृत्तीरायें खुणा दाउनि सकळ बोलतां सिण झणें होईल रया ॥३॥