भजनी मालिका
← भजनांकडे परत

असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी

ason charanavari tumachya theuniyan man | karuniyan kirtan rupin tumachiyan drushti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
असों चरणावरी तुमच्या ठेऊनियां मन । करुनियां कीर्तन रुपीं तुमचियां दृष्टी ॥१॥ होईल ते हो कैसी आमुची गती । नणों योगयुक्ति तप साधन दुसरें ॥२॥ सांगितलें संती करा नामाचा घोक । नलगे मग आणिक कृपा करील श्रीहरी ॥३॥ निळा म्हणे विश्वासें त्या राहिलों ठायी । ठेऊनियां पायीं जीवभाव सकळ ॥४॥