भजनी मालिका
← भजनांकडे परत

अश्व पाहतां तो सोज्ज्वळा । म्हणती निळा शुभ्रासी

ashva pahatan to sojjvala | mhanati nila shubhrasi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
अश्व पाहतां तो सोज्ज्वळा । म्हणती निळा शुभ्रासी ॥१॥ तैसें नांवापासीं काये । करणी आहे विचित्र ॥२॥ केशविंचरिती फणी । तरी काय बहिणी शेषाची ॥३॥ निळा म्हणे सुगरणी । नांवें केरसुणी झाडिती ॥४॥