भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टांगयोगें न सिणिजे

ashtangayogen na sinije

अष्टांगयोगें न सिणिजे । यम नेम निरोध न किजे रया ॥१॥ वाचा गीत गाईजे । गातां वातां श्रवणीं ऐकिजे रया ॥२॥ गीती छंदे अंग डोलिजे । लीला विनोदे संसार तरिजे रया ॥३॥ बापरखुमादेविवरु विठ्ठलु नामें । जोडे हा ऊपावो किजे रया ॥४॥