भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टांग साधनें करिताती योगी । परी मन अव्यंगीं होत नाहीं

ashtang sadhanen karitati yogi | pari man avyangin hot nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अष्टांग साधनें करिताती योगी । परी मन अव्यंगीं होत नाहीं ॥१॥ जिंकितांचि मन साधनें साधती । न जिंकितां फजिती मागें पुढें ॥२॥ एका जनार्दनीं काया वाचा मन । धरुनि बंधन त्यासी करी ॥३॥