भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टांग साधन धूम्रपाण अटी । ब्रह्माज्ञानासाठीं करिताती

ashtang sadhan dhumrapan ati | brahmadnyanasathin karitati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अष्टांग साधन धूम्रपाण अटी । ब्रह्माज्ञानासाठीं करिताती ॥१॥ परि तें न लभे न लभे सर्वथा । वाउग्याची कथा बोलताती ॥२॥ शाब्दिकाचा शब्द कुंठित ते ठायीं । वाउगें कांहीं बाहीं बोलुं नये ॥३॥ एका जनार्दनीं संतकृपा होतां । ब्रह्माज्ञान तत्त्वतां घर रिघे ॥४॥