भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टही प्रहर करिसी संसाराचा धंदा । कां रे त्या गोविंदा स्मरसी ना

ashtahi prahar karisi sansaracha dhanda | kan re tya govinda smarasi na

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अष्टही प्रहर करिसी संसाराचा धंदा । कां रे त्या गोविंदा स्मरसी ना ॥१॥ अंतकांळी कोण सोडवील तूंतें । कां रे स्वहितातें विसरलासी ॥२॥ यमाची यातना न चुके बंधन । सोडवील कोण तुजलागीं ॥३॥ एका जनार्दनीं गुंतलासी वायां । भजे यादवराया विसरूं नको ॥४॥