भजनी मालिका
← भजनांकडे परत

अष्टदळ पाहे पद्म नेत्र दाहे

ashtadal pahe padma netra dahe

अष्टदळ पाहे पद्म नेत्र दाहे । सोहं मंत्र कोहं ठाकी दुरी ॥१॥ आडवीं आडव पारुचा बरब । सखिये तो राव रामराणा ॥२॥ उपरती साधि प्रपंची अवघी । गुणें गुण उद्वोधी शेजे सये ॥३॥ ज्ञानदेवी लपे विज्ञान हारपे । कायम मापें न बाधिती ॥४॥