भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशाबध्दा नाहीं मान । बहुत सन्मान नैराश्या

ashabadhda nahin man | bahut sanman nairashya

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आशाबध्दा नाहीं मान । बहुत सन्मान नैराश्या ॥१॥ याचिलागीं विचार करा । हित तें धरा मानसीं ॥२॥ भजतां देवा देवचि होती । विस्मरणें जात अध:पाता ॥३॥ निळा म्हणे ममता बाधी । नित्य समाधी नि:संगा ॥४॥