भजनी मालिका
← भजनांकडे परत

आशाबध्द देखोनियां विटताती लोक । दयावयासी भीक नाहीं म्हणुन

ashabadhda dekhoniyan vitatati lok | dayavayasi bhik nahin mhanun

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आशाबध्द देखोनियां विटताती लोक । दयावयासी भीक नाहीं म्हणुन ॥१॥ तैसे तुहमी नव्हे लक्ष्मीचे कांत । सदा भाग्यवंत औदायेंसी ॥२॥ आपुल्या संसारिं आपणचि दु:खी । करिती काय सुखी इतरांसी ते ॥३॥ निळा म्हणे येतों तुम्हा काकुळती । नुपेक्षितील श्रीपती म्हणोनियां ॥४॥