भजनी मालिका
← भजनांकडे परत

आर्त माझें पूर्ण झालें । यांची पाउलें देखतां

arta majhen purna jhalen | yanchi paulen dekhatan

रचनाकार: संत निळोबा · अभंग
आर्त माझें पूर्ण झालें । यांची पाउलें देखतां ॥१॥ आतां कोठें न धांवे मन । राहिलें होऊन अचंचळ ॥२॥ याविण कांहीं नलगे जोडी । पुरली आवडी विषयाची ॥३॥ निळा म्हणे ध्यानीं मनीं । राहो चिंतनी हेंचि रुप ॥४॥