भजनी मालिका
← भजनांकडे परत

अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा

ardha kshan ghadata santanchi sangati | tenen hoy shanti mahatpapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अर्ध क्षण घडता संतांची संगती । तेणें होय शांती महत्पापा ॥१॥ संतसंग देई संतसंग देई । आणिक प्रवाही घालुं नको ॥२॥ संसार मज न करणें सर्वथा । परमार्थ पुरता हाती देई ॥३॥ जनार्दनाचा एका करुणावचनीं । करी विनवणी पायांपाशीं ॥४॥