भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी । वारी भक्तांची सांकडीं । नामासाठीं आपुल्या

apulya namachi avadi | vaikunthahuni ghali udi | vari bhaktanchi sankadin | namasathin apulya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुल्या नामाची आवडी । वैकुंठाहुनी घाली उडी । वारी भक्तांची सांकडीं । नामासाठीं आपुल्या ॥१॥ ऐसा नामाचा पोवाडा । नाम उच्चारा घडघडा । तेणीं निवारें यमपीडा । साचपणें भक्तांची ॥२॥ एका जनार्दनीं नाम । सोपें सोपें हो सुगम । तरावया आन नाहीं धाम । नामावांचुन सर्वथा ॥३॥