भजनी मालिका
← भजनांकडे परत

आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं

apulya manasin kariti vichar | na dharave sachar krushna karin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आपुल्या मनासीं करिती विचार । न धरवे साचार कृष्ण करीं ॥१॥ योगीयांचे ध्यानीं न सांपडे कांहीं । तया गोपिकाही धरुं म्हणतीं ॥२॥ धारितां न धरवे तळमळ । वाउगा कोल्हाळ करिती वायां ॥३॥ एका जनार्दनीं शुद्ध भक्तिविण । पवे नारायण कवणा हातीं ॥४॥