भजनी मालिका
← भजनांकडे परत

अणुरेणु पासोनि ब्रह्मांडी भरला । तो म्यां देखिला विटेवरी

anurenu pasoni brahmandi bharala | to myan dekhila vitevari

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अणुरेणु पासोनि ब्रह्मांडी भरला । तो म्यां देखिला विटेवरी ॥१॥ स्थावर जंगम भरुनी उरला । तो म्यां देखिला पंढरीये ॥२॥ वेदशास्त्र पुराणें गाती जयासाठीं । तो पुंडलिका पाठीं उभा दिसे ॥३॥ वेडावल्या श्रुति न कळे म्हणती । तो उभा श्रीपती वाळुवंटी ॥४॥ संताचा समागम गाती आनंदानें । तो हरी कीर्तने नाचतसे ॥५॥ एका जनार्दनें सुखाचा सागरु । विठ्ठल कल्पतरु वोळला आम्हा ॥६॥