भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा

anupamya vache vadatan pandhari | hotase bohare mahatpapa

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुपम्य वाचे वदतां पंढरी । होतसे बोहरे महात्पापा ॥१॥ अनुपम्य ज्याचा विठ्ठली जो भाव । अनुपम्य देव तिष्ठे घरीं ॥२॥ अनुपम्य सदा कीर्तनाची जोडी । अनुपम्य गोडी मनीं ज्यांच्या ॥३॥ अनुपम्य संग संतांचा विसांवा । अनुपम्य भावा पालट नाहीं ॥४॥ अनुपम्य शरण एका जनार्दनीं । कायावाचामनीं छंद यासी ॥५॥