भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुपम्य सुख संताचिया पायीं । राहीन तये ठायीं अखंडित

anupamya sukh santachiya payin | rahin taye thayin akhandit

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनुपम्य सुख संताचिया पायीं । राहीन तये ठायीं अखंडित ॥१॥ अखंडित गोडी सेवीन आवडी । ब्रह्मादिकां जोडी ऐशीं नाहीं ॥२॥ सर्व पर्वकाळ आले तयां ठायां । विश्रांती घ्यावया इच्छिताती ॥३॥ एका जनार्दनीं सुखाचें माहेर । भवसिंधुपार तारक हें ॥४॥