भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणूनियां सिंहासनीं बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार

anuniyan sinhasanin baisavila | puja upachar kela shodashopachar

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणूनियां सिंहासनीं बैसविला । पूजा उपचार केला षोडशोपचार ॥१॥ वस्त्र अलंकार देउनी गौरविला । मग पुसता जाहला क्षेम सर्व ॥२॥ अष्टनायकादि मिळालीसे मांदी । नमिती आनंदी सुदाम्यासी ॥३॥ एका जनार्दनीं सारुनी भोजन । सुखरुप शयन करविलें ॥४॥