भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनुभव खुण मी बोले साजणी

anubhav khun mi bole sajani

अनुभव खुण मी बोले साजणी । निरंजन अंजन लेईलें अंजनी ॥१॥ गुरुमुखें साधन जालें पै निवृत्ति । तत्त्वसार आपणचि जाली निवॄत्ति ॥२॥ बापरखुमादेंविवरा विठ्ठल कृपाचित्तें । पुंडलिका साधलें प्रेम तत्त्वार्थे ॥३॥