भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरींचा भाव दृढ धरी मना । सेवीं तूं चरणा विठोबाच्या

antarincha bhav drudh dhari mana | sevin tun charana vithobachya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंतरींचा भाव दृढ धरी मना । सेवीं तूं चरणा विठोबाच्या ॥१॥ आणिक नको कष्ट कांहीं । राममुखीं गायी सदा नेमें ॥२॥ आकार निराकार सर्वही व्यापक । तो उभा सम्यकक समपदीं ॥३॥ एका जनार्दनीं वाहूनियां आण । विठ्ठलाचे चरण ध्यावे आधीं ॥४॥