भजनी मालिका
← भजनांकडे परत

अंतरीं शुद्ध नाहीं भाव । वरी मिरवी वैराग्य

antarin shuddha nahin bhav | vari miravi vairagya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अंतरीं शुद्ध नाहीं भाव । वरी मिरवी वैराग्य ॥१॥ जळो जळो त्याचें ज्ञान । काय नटाचें भाषण ॥२॥ टिळा टोपी दावी सोंग । बकध्याना मिरवी रंग ॥३॥ शरण एका जनादनीं । त्याचा मंत्र न घ्यावा कानीं ॥४॥