भजनी मालिका
← भजनांकडे परत

आणीकाचें नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवोडोनी

anikachen namen kon ho tarala | aisen sanga mala nivodoni

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आणीकाचें नामें कोण हो तरला । ऐसें सांगा मला निवोडोनी ॥१॥ या रामनामें पातकी पतीत । जीव असंख्यात उद्धरीले ॥२॥ जुनाट हा पंथ शिवाचें हें ध्येय । रामनाम गाये स्मशानीं तो ॥३॥ गिरजेसी आवडी रामनामें गोडी । एका जनार्दनीं जोडी हेंचि आम्हां ॥४॥