भजनी मालिका
← भजनांकडे परत

आंगुलींवरी आंगुली । खेळतसे तान्हुली । पडली तिची साउली । भिन्न माध्यान्ही

angulinvari anguli | khelatase tanhuli | padali tichi sauli | bhinna madhyanhi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आंगुलींवरी आंगुली । खेळतसे तान्हुली । पडली तिची साउली । भिन्न माध्यान्ही ॥१॥ दिवसांचें पाहणें । पाहतां दिसे लाजिरवाणें । खेळ मांडिला विंदानें । नवल ऐका ॥२॥ बारा सोळा घागरीं । पाणी नाहीं थेंबवरी । नाहायासी बैसली नारी । मुक्त केशें ॥३॥ घरधनी उभा ठेला । तेणें रांजण उचलिला । जाउनी समुद्रीं बुडाला । नवल ऐका ॥४॥ नाहतां नारी उठली । परपुरुष भेटली । आनंदानें बैसली । निजस्थानी ॥५॥ काळें निळें नेसली । जाउनी दारवंटीं बैसली एका जनार्दनीं देखिला । नवल ऐका ॥६॥