भजनी मालिका
← भजनांकडे परत

अनतांचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण । तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला

anatanche anant gun | apar par hen lakshan | to samacharan thevun | vite ubha rahila

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
अनतांचे अनंत गुण । अपार पार हें लक्षण । तो समचरण ठेवुन । विटे उभा राहिला ॥१॥ करीं दास्यत्व काळ । भक्तजनां प्रतिपाळ । उदार आणि स्नेहाळ । तो उभा भीवरे ॥२॥ धीर सर्वस्वे बळसागर । निद्रा करी शेषावर । लक्ष्मी समोर । तिष्ठत सर्वदा ॥३॥ खेळे कौतुकें खेळ । तोडी भक्तांचे मायाजाळ । एका जनार्दनीं कृपाळ । स्वामीं माझा विठ्ठल ॥४॥