भजनी मालिका
← भजनांकडे परत

आनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पारश्रुतीशास्त्रीं

anantache gun anant apar | na kalechi parashrutishastrin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आनंताचे गुण अनंत अपार । न कळेचि पारश्रुतीशास्त्रीं ॥१॥ तो हा महाराज विटेवरी उभा लावण्याचा गाभा शोभतसे ॥२॥ कटावरी कर ठेवी जगजेठी । पाहे कृपादृष्टी भक्तांकडे ॥३॥ पुंडलिकाचे तेजें जोडलासे ठेवा । एका जनार्दनी सेवा देई देवा ॥४॥